By  
on  

'नवा गडी नवं राज्य' मालिकेची फक्त 92 वर्षांची चाहती भेटली कलाकारांना

'नवा गडी नवं राज्य' हि मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असून सर्व वयोगटातील प्रेक्षक ह्या मालिकेला लाभले आहेत. आता हेच पहाना, पुण्यात पार पडलेल्या उत्सव नात्यांचा ह्या सोहळ्यात चक्क 92  वर्षाच्या गोड़ आजींनी हजेरी लावून त्या उत्सवाचा आनंद घेतला, हे दृश्य फार आश्चर्यकारक होते.

ह्या प्रसंगाचे औचित्य साधून आपल्या लाडक्या रमा ,आनंदी आणि राघव ह्या कलाकारांनी अश्या रसिक आजींची भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद तर घेतलाच व त्यांच्या शुभेच्छा सुमनांचा स्वीकारही केला. प्रेक्षकांकडून असेच भर भरून प्रेम भेटते हे पाहून फार आनंद होतो. सर्व नात्यांना भुरळ पडणारी हि मालिका पाहायला विसरू नका 'नवा गडी नवं राज्य' रात्री ९: ०० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive