अवधूत गुप्तेंचा 'खुपते तिथे गुप्ते' तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

झी मराठी वाहिनीचा पूर्वीसारखा प्रेक्षकवर्ग राहिलेला नाही. सतत टीआरपी कमी पडतो. पूर्वीच्या दर्जेदार मालिका देणारी ही वाहिनी कुठेतरी चांगला कॉंटेट दे्यात कमी पडतेय असं वाटू लागलं आहे. वाहिनी सध्या टीआरपी वाढण्यासाठी नवनवीन फंडे वापरत आहेत. अनेक नव्या मालिका  वाहिनीवर सुरु झाल्या आहेत. असाच एक शो झी मराठीवर गाजला होता. आता तब्बल १० वर्षानंतर पुन्हा हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परतणार आहे.

झी मराठीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी एक गाजलेला शो पुन्हा परतणार आहे. अवधूत गुप्ते निर्देशित  'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम लवकरच पुन्हा नव्याने सुरु होणार आहे. झी मराठीने 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. अवधूत गुप्ते (त्याच्या स्टाईलमध्ये म्हणत आहे की, प्रश्नांची धार वाढणार...आता खुपणार नाही तर टोचणार...'खुपते तिथे गुप्ते' लवकरच". अवधूतनेदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"खुप्ते तिथे गुप्ते लवकरच...पुन्हा घेऊन येतोय तुमच्या भेटीला".

अवधूत गुप्ते यांच्या गाजलेल्या या शोसाठी अग्गं अग्गं सूनबाई, काय म्हणता सासूबाई ह्या मालिकेला निरोप घ्यावा लागतोय, 

Recommended

Loading...
Share