Photos : जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारांची अक्कलकोट वारी

By  
on  

जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामींच्या अगाध लीला पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आसुसलेले असतात.मालिकेनं अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मालिकेत अभिनेता अक्षय मुदवाडकर यानं स्वामींची मुख्य भूमिका साकारली आहे. 

आता या मालिकेच्या टीमने नुकतंच अक्कलकोटच्या स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. 

. प्रेक्षक आणि स्वामी भक्तांमध्ये ही मालिका खुप लोकप्रिय आहे. दोन वर्ष या मालिकेतून स्वामींच्या लीला दाखवल्या जात आहे.

अक्कलकोटच्या मंदिरातील या कलाकारांचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. 

यावेळी मालिकेतील प्रत्यक्ष स्वामी, चोळप्पा, चंदा आणि दाजीबा या भूमिका साकारणारे कलाकार उपस्थित होते.

जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारांची ही अक्कलकोटवारी भक्तगण आणि प्रेक्षकांना सुखावणारी होती. 

Recommended

Loading...
Share