शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्य लढा मावळा बनून सोनी मराठी वाहिनीवरील 'छोट्या बायोची मोठी स्वप्नं' मालिकेतील वीणा जामकर आणि रुची नेरुरकर यांनी महाराष्ट् दिनाचं औचित्य साधून अनुभवला. मावळा या खेळाच्या माध्यमातून सोनी मराठी वाहिनीच्या कलाकारांना हा विषेश अनुभव घेता आला. त्या वेळी कलाकारांबरोबर मुंबईतल्या शेकडो मुलांचा आणि त्यांच्या पालकांची सहभाग होता. त्यांनी कलाकारांबरोबर या खेळाचा आनंद लुटला. स्वराज्याच्या लढ्यात मावळ्यांनी एकत्रितरित्या येऊन ज्याप्रकारे जिद्दीने स्वराज्या साठीचा लढा दिला तशीच मावळ्यांची जिद्द या खेळातून आपल्याला अनुभवता आली. जिद्द असेल तर समोर ठाकलेल्या संकटावर आपण निश्चितच मात करू शकतो. आपली स्वप्नं प्रत्यक्षात साकारू शकतो हे ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेतून देखील पाहायला मिळत आहे. बयोच्या शिक्षणाचा प्रवास त्यासाठी ती आणि आई घेत असलेले कष्टं पाहणं लहान मूलं आणि पालकांसीठी उपयुक्त ठरू शकेल.
सध्याची पिढी मोबाईल च्या जाळ्यात अडकत आहे. त्यांना या जाळ्यातून बाहेर पडता यावे, संघ कार्याचे महत्व कळावे यासाठी मावळा या खेळाची निर्मिती करण्यात आली आहे. 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेतून देखील अशाच प्रकारचा संदेश दिला जातो आहे. बयो आणि इतर मुलांची क्रिकेट मॅच, वनभोजन या पर्यायी उपक्रमाचा सहभाग बयो आणि तिचे सवंगडी करताना दिसत आहेत. शिवाय अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेची टीम रणांगण आयोजित या कार्यक्रमात सहभागी झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आजच्या पिढीला मिळावी यासाठी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' ह्या मालिकेच्या चमूने रणांगण या अनोख्या उपक्रमातून मावळा ह्या खेळाचा अनुभव घेतला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विलेपार्ले येथे आराध्य इव्हेंट्सने आयोजित केलेल्या खेळात सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण निरनिराळ्या लढ्यांतून पाहायला मिळाली. तसेच बायोच्या शिक्षणाची जिद्द 'छोट्या बायोची मोठी स्वप्नं' या मालिकेतून सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे. बायोचे डॉक्टर व्हायचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. पाहायला विसरू नका, 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं', सोम. ते शनि. रात्री ८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.