सिनेमा मराठी, कलाकार तंत्रज्ञ मात्र अमेरिकन, वाचा काय आहे हे गोलमाल?

By  
on  

मराठी सिनेमाचा झेंडा सातासमुदा पार कधीच गेला आहे. मराठी सिनेमाची मोहिनी आता परदेशी असलेल्या असलेल्या कलाकारांवरही पडली आहे. परदेशात असलेल्या मराठी कलाकारांनी ‘DNA’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा २९ जूनला अमेरिकेत रिलीज होणार आहे. आशय जावडेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मकरंद भावे आणि दीपालीने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

 

यात अनेक अमेरिकन कलाकार काम करत आहेत. आजच्या काळातील महत्त्वाच्या समस्येवर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं आहे. एक जोडपं त्यांचं बाळ जेनेटिकली परफेक्ट बनवण्यासाठी धडपडत असतात. त्यातील काही वैज्ञानिक प्रयोग करण्यासही ते तयारही होतात. त्यांचा हा प्रयोग यशस्वी होतो का? ते बाळाचा स्विकार करतात का? हे सगळं समजण्यासाठी सिनेमा पाहावा लागेल. प्राजक्ता करंदीकर, मानसी बेडेकर, ऋषीकेश साने आणि मैत्रेयी साने यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.

Recommended

Loading...
Share