राणादाची एक्झिट की मेकओव्हर? चाहत्यांना लागून राहली काळजी

By  
on  

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत दिवसेंदिवस रंगत वाढतच चालली आहे. नुकतीच पाठकबाईंकडे गोड बातमी असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होती. पण आता मालिकेत एक वेगळाच ट्वीस्ट येऊ घातला आहे. पप्या पाटीलने केलेल्या मारहाणीत राणाचा मृत्यू झाल्याचं सीन यावेळी सेटवर शूट केला गेला. त्यामुळे राणाची मालिकेतून एक्झिट होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. राणा ही मालिका सोडणार म्हटल्यावर अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या, मालिकेचा प्लॉट कसा पुढे जाणार याचाही अंदाज बांधला जाऊ लागला. पण एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार राणादा या मालिकेतून कायमची एक्झिट घेणार नाही. तर तो या मालिकेत जवळपास महिनाभर नसणार आहे.

 

राणा महिनाभर का नसेल याची खात्रीलायक माहिती मात्र झी वाहिनी किंवा हार्दीक जोशी याच्याकडूनही मिळू शकलेली नाही. महिनाभरानंतर मात्र राणाचं या मालिकेत बदललेलं रुप पाहावयास मिळेल असं बोललं जात आहे. एरवी पैलवानाच्या लूकमध्ये असलेला राणा बारीक झालेला असेल आणि त्याच्या आताच्या लूकपेक्षा वेगळा असा त्याचा लूक असल्याचं बोललं जात आहे. आता मालिकेत नक्की काय होतय ते वेळ आल्यावरच कळेल.

Recommended

Loading...
Share