झी मराठीवरील प्रेक्षकांची ही लाडकी मालिका घेणार निरोप, त्या जागी ‘मिसेस मुख्यमंत्री’ बसवणार बस्तान

By  
on  

सध्या झी मराठीवर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेचा ट्रेलर दिसत आहे. ही नवी मालिका कोणत्या मालिकेची जागा घेणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ही उत्सुकता आता लवकरच संपेल. ‘लागीरं झालं जी’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

 

‘लागीरं झालं जी’ मालिकेत अज्या आणि शितली यांच्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ग्रामीण बाजाचे संवाद, टिपिकल ग्रामीण लोकेशन आणि स्टोरीला असलेली देशभक्तीचा टच यामुळे या मालिकेच्या चाहत्यांची संख्या मोठी होती. त्यातच शितलीकडे असलेली गोड बातमी, अज्याचं अचानक गायब होणं यामुळे मालिकेचा प्रवास रंजक वळणावर आला होता. त्यामुळेच की काय ही मालिकांना प्रेक्षकांना हुरहूर लावून निरोप घेणार असल्याचं समजत आहे.

येत्या २२ जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी आता ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही मालिका सुरु होत आहे. अमृता धोंगडे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

Recommended

Loading...
Share