आता सगळे होणार फॅन राजा राजगोंडाचे, तुम्ही ओळखलं का याला?

By  
on  

मालिकांची लांबी बरीच मोठी असते. त्यामुळे अनेकदा कथानकात लीप घ्यावे लागतात किंवा मोठे बदल करावे लागतात. प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मध्येही असाच ट्वीस्ट आणि टर्न येताना दिसणार आहे. या मलिकेत नुकताच राणावर हल्ला झाल्याचं दाखवलं होतं. यामध्ये जखमी झालेला राणा पाण्यात पडतो आणि गायब होणार असल्याचं दाखवलं होतं. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

राजा राजगोंडा! R R!

A post shared by Akshaya Deodhar (@akshayaddr) on

 

राणाने मालिकेतून कायमची एक्झीट घेतली की काय अशी चर्चाही सुरु होती. पण या राणा नव्या रुपात समोर आला आहे. दक्षिणी अभिनेत्यांच्या स्टाईल प्रमाणे एंट्री घेणारा राणा आता राजा राजगोंडा बनला आहे. दबंग स्टाईलने गुंडांची धुलाई करत तेवढ्याच स्टायलिश अंदाजात राहणारा राणा बराच बदलला आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरी बाजाची भाषा न वापरता काहीशी दक्षिणी भाषेच्या ढंगात बोलणारा हा राणा काय काय धमाल करतो ते येत्या २८ जूनला कळेलच.

Recommended

Loading...
Share