By  
on  

सासूबाईंच्या लग्नासाठी सजली लग्नवेदी, पण नवरदेव आहेत तरी कोण?

विविध विषयांवर मालिका प्रेक्षकांसमोर सादर करण्यात झी मराठी वाहिनी कायमच आघाडीवर राहिली आहे. आता यात आणखी एका मालिकेची भर पडली आहे.  'अग्गबाई सासूबाई' असं या नवीन मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. यात तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नवरी बाई बनलेल्या या सासूबाईंचे नवरदेव कोण हे मात्र पहिल्या प्रोमोत दिसलं नाही. पण दुस-या प्रोमोमध्ये मात्र हे समोर आलं आहे.

 

‘एव्हरग्रीन अभिनेते गिरीष ओक’ यात निवेदिता यांच्या पतीची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत सासूबाईंच्या विवाहाचा वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. या नवीन मालिकेत तेजश्रीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेच्या माध्यमातून वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'अग्गबाई सासूबाई' ही नवीन मालिका २२ जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive