पाहा Photos: सुमी-समरची लगीन घाई, Photoshoot साठी सजली नवराई

By  
on  

सध्या झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री मालिकेत जोरदार लगीन घाई सुरु आहे. या लगीन घाईत मात्र सुमी आणि समर जमेल तितका वेळ एकत्र घालवताना दिसत आहेत. समरच्या आईला ही आगळी सोयरीक आजिबात पसंत नाही. त्यासाठी तिने लग्न अगदी साधेपणाने करण्याचा घाटही घातला आहे. पण अशा कारस्थानांवर सुमी भारी पडताना दिसत आहे.

 

या लग्नाची खरेदीही अलीकडेच पार पडली. सुमीच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट अगदी यथासांग होताना दिसत आहे. अलीकडेच सुमी आणि समरच्या प्री वेडिंग शुटचे फोटोही समोर येताना दिसत आहेत. यावेळी या दोघांनी इतर मराठी कलाकारंनाही चॅलेंज दिलं की त्यांनीही त्यांच्या लग्नाचे हे फोटो सोशल मिडियावर शेअर करायचे. पारंपारिक वेषातील सुमी आणि समर खुपच सुंदर दिसत आहेत. सुमीने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर समरने गुलाबी रंगाचं धोतर आणि कुर्ता घातला आहे. आता या दोघांच्या लग्नाची वाट सगळे प्रेक्षक पाहात आहेत. 

Recommended

Loading...
Share