By  
on  

अभिनेता अतुल आगलावेला चाहतीकडून मिळालं खास गिफ्ट

आपल्या लाडक्या कलाकारासाठी चाहते काहीही करत असतात. अनेकदा ते लाडक्या कलाकराला संदेश पाठवून प्रेम व्यक्त करतात तर कधी खास गिफ्ट पाठवतात. स्टार प्रवाहवरील मोलकरीणबाई मालिकेतील रितीक म्हणजेच अभिनेता अतुल आगलावे यालाही त्याच्या चाहतीने खास गिफ्ट पाठवलं आहे. ऋतु प्रधान असं या चाहतीचं नाव आहे. तिने अतुलच्या फोटोचं कोलाज केलं आहे.

 

 

याशिवाय त्याच्यामध्ये अतुल असं लिहिलं आहे. मोलकरीणबाई मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात जागा मिळवली आहे. काही दिवसांपुर्वीच या मालिकेचे 100 भाग पूर्ण झाले आहेत. घरकामासाठी येणारी मोलकरीण बाई अनेक कुटुंबातील महिलांचा सर्वात मोठा आधार असतो. विशेषत: करीअरसाठी घराबाहेर असलेल्या स्त्रियांची मदार मोलकरीणबाईवरच अवलंबून असते. अतुल शिवाय या मालिकेत उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम यांच्याही भूमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive