By  
on  

व-हाडी पुण्यात पोहचू नयेत म्हणून गोपिकाबाई कोणती खेळी खेळणार?

काही दिवसांपुर्वीच सुरु झालेली ‘स्वामिनी’ ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत सृष्टी पगारे, ऐश्वर्या नारकर यांची भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. कडक स्वभावाच्या गोपिकाबाईंनी माधवच्या लग्नाचा घाट घातला आहे खरा, पण रमेच्या स्थळाला त्यांचा विरोध आहे. त्यातूनच हे लग्न होऊ नये यासाठी खटाटोप करताना दिसत आहे

 

लग्नासाठी नाशिकहून पुण्याकडे येण्यास निघालेल्या व-हाड्यांचे स्वागत करण्यासाठी पेशव्यांचे कारभारी तयारीत असतात. पण गोपिकाबाई त्यांना जाण्यासाठी विरोध करतात. आता काय होणार? रमा आणि तिचे कुटुंबिय पेशव्यांच्या पसंतीस उतरणार का? रमेचा अवखळपणा कठोर स्वभावाच्या गोपिकाबाईंचं मन जिंकू शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive