राणा अंजलीच्या प्रेमात येणार नवीन विघ्न? कोण असेल ही व्यक्ती

By  
on  

तुझ्यात जीव रंगला या मालिकेने आता प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. गेली तीन वर्ष ही मालिका रसिकांच्या मनात स्थान टिकवून आहे. आता या मालिकेत रंजक वळण येताना दिसत आहे. वहिनीसाहेबांच्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी राणा आता राजगोंडा बनून आला आहे.

राजगोंडा हाच राणा असल्याचं अंजलीला ठावूक आहे. पण तिच्या आईवडिलांना ते पटत नाहीये. त्यामुळे अंजलीच्या घरचे तिला माहेरी घेऊन आले आहेत. याच दरम्यान तिच्या आयुष्यात आणि घरात एक नवीन पाहुणा येत आहे. विकास पाटील हा अभिनेता नव्या पाहुण्याच्या व्यक्तिरेखेत एंट्री घेताना दिसणार आहे. त्यामुळे राणा अंजलीच्या नात्यात तर काही विघ्न येणार नाही ना? राजगोंडा अंजलीच्या घरच्यांना पटवून देईल का तोच राणा आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

Loading...
Share