By  
on  

आदिनाथ कोठारेचा नवा ‘प्रेम पॉयझन पंगा’ समजला का?

मालिकांचे तेच तेच विषय पाहून कंटाळलेल्या रसिकांच्या भेटीला आता एक नवीन आणि हटके मालिका येत आहे. अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि ‘कोठारे व्हिजन’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे ‘प्रेम, पॉयझन, पंगा’. महेश कोठारेंएवजी ह्यावेळेस आदिनाथ आपल्याला  निर्मात्याच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. अनेक दिवसांपासून आदिनाथचा इच्छाधारी नागीण  या विषयावर मालिका करण्याचा विचार सुरु होता. अखेर त्याची ही संकल्पना आता छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

 

 

इतर मालिकांप्रमाणे या मालिकेत लव्हस्टोरी असली तरी त्यात एक हटके ट्वीस्ट आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये आलाप देसाई पडला आहे एका जुई भोळेच्या प्रेमात. पण जुई तुमच्या आमच्यासारखी नाही तर इच्छाधारी नागीण आहे. त्यामुळे आलापवर तिचं प्रेम असलं तरी अनेकदा तिला अडचणींनांही सामोरं जावं लागतं.

 

 

पण ही नागीण इच्छाधारी असली तरी स्वभावाने भलतीच गोड आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या मनातील नागीणीची नकारात्मक प्रतिमा ही नागीण नक्कीच बदलेल. ही मालिका आजपासून म्हणजेच 28 ऑक्टोबरपासून झी युवावर रसिकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका ‘फुलपाखरु’ या मालिकेची जागा घेणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive