मालिकेचा निरोप घेताना धनश्री काडगावकर झाली भावूक, शेअर केल्या या भावना

By  
on  

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील एक महत्त्वाचा सदस्य आता मालिकेतून एक्झिट घेणार आहे. तो म्हणजे नंदिता वहिनी म्हणजेच धनश्री काडगावकर. धनश्रीने नुकताच या मलिकेचा तिचा शेवटचा एपिसोड शूट केला होता. यावेळी धनश्रीने सोशल मिडियावरून भावना शेअर केल्या होत्या. आताही तिने सेटवरील एका खास व्यक्तीचे आभार मानले आहेत. निरंजन पत्की हे त्या व्यक्तीचं नाव आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तुझ्यात जीव रंगला च्या पाहिल्या दिवशी " तू हे करू शकतेस" हा आत्मविश्वास या माणसाने मला दिला... माझा पहिला शॉट होई पर्यंत खूप लोक थांबले होते, ही कसं करतेय हे बघायला, उसना कॉन्फिडन्स मी पण आणला होता चेहऱ्यावर... पण आतून खूप भीती वाटत होती.. निरंजन सरांना ती जाणवली असावी, कदाचित म्हणून माझा पहिला शॉट झाल्यावर येऊन ते म्हणाले, करेक्ट पकडे हें... सर तुमचं कुठल्याही कठीण प्रसंगी शांत राहून गोष्टी हाताळण कायम लक्षात राहील.. तुम्ही मला पहिल्या दिवशी, पहिल्या सीन च्या पहिल्या शॉट ला तो नंदिता म्हणून उभं राहण्याचा विश्वास दिला नसता, तर कदाचीत हे इतकं नसतं जमलं मला... तुमच्या सोबत अजून खूप काम करायची इच्छा आहे... खूप खूप thank u... @niranjanpatki

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

 

निरंजन ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे दिग्दर्शक आहेत. निरंजन यांनी मालिकेच्या पहिल्या दिवसाच्या शुटिंगवेळी नंदिता साकारताना धनश्रीला दिलेल्या प्रोत्सहनाच्या आठवणी तिने चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. धनश्री आता कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून रसिकांच्या समोर येते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share