By  
on  

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये राजलक्ष्मी गायकवाड साकारतीये ही कलाकार

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत अनेक वळणं येताना दिसत आहेत. राणाचं नाहीसं होणं, नंदिताने सगळा कारभार हाती घेणं, राणाची राजगोंडा म्हणून एंट्री होणं त्यानंतर राणाने नंदिताचा डाव उघडकीस आणणं, नंदिताला जन्मठेप होणं या सगळ्या घडामोडींनी मालिकेला वेगळं वळण दिलं. यासोबत मालिकेत नव्या कलाकारांची एंट्रीही झाली आहे.

राणा-अंजलीची लेक लक्ष्मी गायकवाड हिची मालिकेतील एंट्री लक्षवेधी ठरत आहे. याशिवाय तिचं बेधडक बोलणंही अनेकांना आवडत आहे. वाग्मी शेवडे ही राजलक्ष्मीची व्यक्तिरेखा साकारत आहे.

वाग्मी मुंबईमध्ये असून तिला नृत्याची आवड आहे. शाळेतील अनेक स्पर्धांमध्ये तिचा सहभाग असतो. वाग्मीच्या वडिलांचं नाव अमेय शेवडे असं असून ते सध्या मुंबईमध्ये स्थायिक आहेत. तर तिची आई तेजस्विनी आपटे-शेवडे गृहिणी आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive