By  
on  

आण्णा नाईकांची नवी खेळी, शेवंता सापडणार का पोलिसांच्या जाळ्यात?

‘रात्रीस खेळ चाले 2’ मध्ये आण्णा नाईकांचं कुटिल कारस्थान आता चांगलंच रंगताना दिसत आहे. काशी प्रमाणेच आण्णांनी शोभाचाही गुप्तपणे खुन केला आहे. पण हा खून शेवंताला माहीत आहे. तो उघडकीस आणण्याची धमकीही तिने आण्णांना दिली आहे. पण कुटनितीमध्ये चार पावलं पुढं असणारे आण्णा पोलिसांच्या चौकशीचा रोख त्यांच्याऐवजी शेवंतावर आणण्यात काहीसे यशस्वी ठरताना दिसत आहेत.

 

आण्णा पोलिस चौकीत जाऊन शोभाला शोधण्याच्या कामाची माहीती पोलिसंकडून घेतात. यादरम्यान शेवंताच्या घराबाहेर शोभा हरवली असल्याचे पत्रक चिटकवलेलं असतं. शेवंताला हे पाहून चांगलाच हादरा बसला आहे. एकीकडे वच्छी शोभा सुखरुप घरी यावी म्हणून देव-देव करताना दिसत आहे. शोभाचं नक्की काय झालं हे समोर येईपर्यंत आण्णा पुरावे नष्ट करतात का? हे लवकरच समजेल.

Recommended

PeepingMoon Exclusive