दोन स्पेशलच्या भागात बिग बॉस मराठीच्या सदस्यांबरोबर रंगणार गप्पांची मैफल !

By  
on  

कलर्स मराठीवर दोन स्पेशल कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे... सगळ्यांनाच आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यात हळूच डोकावून बघायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडते. ही मंडळी त्यांच्या खर्‍या आयुष्यात कश्या आहेत, त्यांची सुख - दु:ख, भावुक करणार्‍या गोष्टी, त्यांचा इथवरचा प्रवास कसा होता, या मंडळी प्रसिद्धीच्या शिखरावर कसे बरे पोहचले असतील ? आणि बरच काही... या आठवड्यामध्ये दोन स्पेशलच्या कट्ट्यावर येणार आहेत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मैत्री, प्रेम आणि स्पर्धेचे उत्तम उदाहरण देणारे सहा सदस्य म्हणजेच नेहा शितोळे, माधव देवचके, वीणा जगताप, शिव ठाकरे, सुरेखा पुणेकर आण अभिजीत बिचुकले...

या सिझनमध्ये चर्चा झाली ती म्हणजे वीणा – शिवच्या जोडीची, तर अभिजीत बिचुकले कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहिले... बिग बॉस मराठीच्या घरातील किस्से आणि आठवणी पुन्हा एकदा या सगळ्यांनाच आठवणार आहेत.. जितुसोबत या कार्यक्रमामध्ये गप्पा चांगल्याच रंगल्या...

अनेक गोष्टींवर चर्चा होणार आहेत, पण अभिजीत बिचुकले आणि सुरेखा पुणेकर यांच्यामध्ये कोणत्या गोष्टींवरुन पुन्हा वाद झाला ? दोन स्पेशल भागामध्ये तरी हे वाद मिटतील का ? जाणून घेण्यासाठी बघा दोन स्पेशल गुरु – शुक्र रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Recommended

Loading...
Share