By  
on  

अशी रोवली जाणार स्वराज्याची मुहुर्तमेढ, रणरागिणी जिजाऊ येणार भेटीला

स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मराठी साम्राज्याची प्रेरणा असलेल्या जिजाऊ आता युवारुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. इतिहासाच्या पानांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे छाप पाडणाऱ्या  या १६व्या शतकातील स्त्रीशक्तीचं अष्टपैलू रूप म्हणजे जिजामाता .आपल्या गर्भातून केवळ एक कर्तृत्ववान बाळच नव्हे तर स्वराज्य जन्माला घालणाऱ्या जिजाऊंचा तेजस्वी प्रवास आता प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

 

 

या नव्या पर्वाचा प्रोमोही रिलीज झाला आहे. यात घोड्यावर स्वार झालेल्या जिजाऊ हाती भगवा धरून वेगाने येताना दिसत आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून जिजा ते जिजाऊ बनण्याच्या तेजस्वी प्रवासाला सुरुवात होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive