By  
on  

बाबासाहेबांवरील आत्याबाईचे मायेचे छत्र हरपणार

मायेच्या ममतेनं तिनं जपलं
आयुष्यात धडपडताना सावरलं..
धन्य ती माऊली ऐसी,
जिने भीमरायला घडवलं....

आईच्या अकाली मृत्यूनंतर बाबासाहेबांवर आईच्या मायेने प्रेम करणारी, प्रत्येक कसोटीच्या प्रसंगात त्यांच्यासोबबत सावली सारखी वावरणारी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आत्याबाई. आईसमान या आत्यावर बाबासाहेबांचाही प्रचंड जीव होता. मात्र नियतीचा फेरा खुद्द महामानवालाही चुकला नाही. आई, वडिल, भाऊ आणि मुलाला गमावल्यानंतर आत्याच्या निधनाचा मोठा धक्का बाबासाहेबांना पचवावा लागला.

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा भावनिक प्रसंग पाहायला मिळणार आहे. घरातली कर्ती बाई लवकर निर्वतल्यानंतर खमक्या बाण्यानं उभी राहून संपूर्ण सकपाळ कुटूंबाला सावरणारी, बाबासाहेबांना मोठं करणारी ही आत्या. लहानग्या भीवाला प्रेमाने घास भरवणारी, भीवाच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून कायम झटणारी आणि घराला खऱ्या अर्थाने घरपण देणारी अशी ही मीरा आत्या. महामानवाला घडवणाऱ्या आत्याबाईंचे उपकार कधीच विस्मरणात जाणारे नाहीत. आईचा मृत्यू झाल्यानंतर पोटच्या लेकरासारखा सांभाळ करून बाबासाहेबांना वाढवणाऱ्या आत्याचे ऋण बाबासाहेबांनी वेळोवेळी व्यक्त केलेत.

 

 

२६ नोव्हेंबर रोजी आत्याबाईंचा या मालिकेतला प्रवास संपणार आहे. अभिनेत्री पुजा नायकने महामानवाच्या आत्येची भूमिका जिवंत केली. पुजाने साकरलेल्या आत्याबाई या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही भूमिका तिच्यासाठी कायम संस्मरणीय राहिल.   

तेव्हा सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला विसरु नका डॉ. बाबासाहेब आंबेडकर... महामानवाची गौरवगाथा.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive