प्रेक्षकांसमोर उलगडणार अग्निहोत्र 1 चा प्रवास, हे कलाकार येणार भेटीला

By  
on  

येत्या काही दिवसातच स्टार प्रवाहवर अग्निहोत्र 2 ही मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे. या दरम्यान मालिकेच्या पहिल्या भागाची आठवण प्रेक्षकांना होणं सहाजिक आहे. त्यामुळेच या मालिकेतील कलाकार रसिकांच्या भेटीला येणार आहेत. रविवारी म्हणजेच 1 डिसेंबर रात्री 8 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. 

 

या कार्यक्रमात विक्रम गोखले, मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, उदय टिकेकर, शुभांगी गोखले, इला भाटे रसिकांसोबत पहिल्या भागाच्या आठवणी शेअर करणार आहेत. अग्निहोत्रचं दुसरं पर्व 2 डिसेंबरपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. 

 

अभिनेत्री पल्लवी पाटील, प्रतीक्षा मुणगेकर आणि रश्मी अनपट या अभिनेत्री अग्निहोत्रींच्या नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. याशिवाय गजानन अग्निहोत्रींच्या भूमिकेत शरद पोंक्षेही दिसत आहेत.

 

 

 

Recommended

Loading...
Share