By  
on  

रमेच्या आईवर आला अंगठी चोरीचा आळ, छोट्या पेशवीणबाई उचलणार कोणतं पाऊल

‘स्वामिनी’ या कलर्स मराठीवरील वाहिनीवरील मालिकेमध्ये आता रंजकता अधिकच वाढली आहे. विवाहाचे विधी आणि इतर सोपस्कार पार पाडल्यानंतर रमाचे आई-वडिल रमा आणि जावई माधवरावांसह गराड्याला आले आहेत. गोपिकाबाईंना माधवरावांचं गराड्याला जाणं फारसं रुचलेलं नसतं. त्यामुळे त्या मेहंदळेंना त्यांच्यावर आणि तिथल्या घडामोडींवर नजर ठेवण्यास पाठवतात. या दरम्यान मेहंदळेंना शाही अंगठी सापडते. 

 

 

ते रमेच्या आईवर चोरीचा आळ घेतात. तेवढ्यात तितेह रमा येते. ती मेहंदळेंना चांगलेच खडसावते. शिवाय आईवर चोरीचा आळ घेतल्यास ती स्वत: पेशवीण बाई असल्याने त्यांना शिक्षा करण्याची तंबी देते.आता रमा आणि माधवच्या नात्यावर कोणतं नवं वादळ घोंघावत आहे हे लवकरच कळेल. आज स्वामिनीचा एक तासाचा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. रात्री 8 वाजता हा एपिसोड प्रसारित होईल.

Recommended

PeepingMoon Exclusive