‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

By  
on  

कलर्स मराठीवरील  'घाडगे अ‍ॅण्ड सून' ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 23 डिसेंबर ते 28 डिसेंबर हा या मालिकेचा शेवटचा आठवडा असणार आहे. या वर्षीच्या मार्चमध्ये या मालिकेने 500 भागांचा टप्पा पुर्ण केला होता. ऑगस्ट 2017मध्ये सुरु झालेल्या या मालिकेने रसिकांशी खास नातं निर्माण केलं आहे.

 

 

 

अक्षय-अमृता ची केमिस्ट्री लोकांना आवडलीच याशिवाय समंजस, विचारी माई रसिकांच्या मनात घर करून गेल्या. कियारा आणि वसुधा यांनी खलनायिका उत्तम साकारली. आता अक्षय-अमृता मधील दुरावा संपला आहे. माईंच्या मनासारखं झाल्याने त्याही खुष आहे. त्यामुळे निरोपाची हीच वेळ उत्तम असा संदेश देत ही मालिका रसिकांचा निरोप घेणार आहे.

Recommended

Loading...
Share