अभिनेत्री नीना कुलकर्णी दिसणार ‘ताराबाई’च्या भूमिकेत

By  
on  

काही दिवसांपुर्वीच सुरु झालेली ‘स्वामिनी’ ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत सृष्टी पगारे, ऐश्वर्या नारकर यांची भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. कडक, करारी स्वभावाच्या गोपिका बाई तर त्याला विरुद्ध स्वभावाच्या रमाबाई. अशी ही सासू-सुनेची जोडी अनेकांना पसंत पडत आहे. आता या मालिकेत आणखी एक चेहरा येणार आहे.

अभिनेत्री नीना कुलकर्णी या सिनेमात ताराबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यक्तिरेखेत त्यांचा लूक अगदीच साधा असणार आहे. आता ताराबाई या मालिकेत कोणती धमाल करणार ते लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share