एका बाजूला पती तर एका बाजूला मुलगा, अरुंधती घेणार कुणाची बाजू?

By  
on  

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत सर्वांना सांभाळून घेणारी, घरातील प्रत्येकाचं मन जपणारी अरुंधतीची भूमिका देखील सगळ्यांना आवडत आहे. पण आता अरुंधती वेगळ्याच संकटात सापडली आहे. मुलगा अभिषेकच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी त्याच्या मैत्रिण अंकिताची आई घरी येते. पण अरुंधतीचं साधं ग्रॅज्युएशनही न झाल्याचं तिला समजतं. यावर ती अरुंधतीला सुनावत असतानाच अनिरुद्ध तिची बाजू घेऊन वाद घालतो. 

 

 

यावर अंकिताची आई लग्न करायचं नसल्याचं सांगून निघून जाते. यावर अरुंधतीचा मुलगा अभिषेक तिच्यावर उखडतो. तो घराबाहेर निघून जाणार असल्याचं सांगतो. यावर अनिरुद्ध त्याला एकदा गेलास की परत येण्याची संधी मिळणार नाही असं सुनावतो. यावर अरुंधती त्याला थांबवण्यास घराबाहेर जाते. त्यावेळी तो तिलाही हाच नियम लागू असल्याचं सांगतो. आता पतीचं ऐकायचं कि मुलाला समजावायचं या दुहेरी संकटात अरुंधती सापडली आहे.

Recommended

Loading...
Share