संजीवनीने दिला रणजीतला होकार, आता वाजणार ढाले-पाटलांच्या घरी सनई-चौघडे

By  
on  

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत एक वेगळाच ट्वीस्ट येताना दिसत आहे. कलर्स मराठीवरील या मालिकेत आत सनई-चौघड्यांची नांदी होताना दिसत आहे. रणजीत आणि संजीवनी आता लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत. संजीवनीची बहीण स्वरांगी रणजीतसोबत लग्न करण्याआधीच मांडवातून पळून गेल्याने बांदल कुटुंबियांवर नामुष्कीचं संकट ओढवलेलं असतं. घरात आत्महत्येविषयी बोलणी सुरु असतानाच रणजीत येतो आणि संजीवनीला मागणी घालतो. 

 

 

संजीवनी त्याच्या या मागणीने गोंधळते पण लग्नाला होकार देते. अवखळ संजीवनी आणि गंभीर रणजीतच्या मुहुर्त देखील ठरला आहे. 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारीला संजीवनी-रणजीतच्या लग्नाचा सप्ताह असणार आहे. संजीवनीचं रणजीतशी लग्न करण्याचं स्वप्न पुर्ण होताना दिसत आहे.

Recommended

Loading...
Share