By  
on  

डॉक्टर डॉन पडलाय डीन च्या प्रेमात, कशी असणार त्यांची अतरंगी लव्हस्टोरी

अभिनेता देवदत्त नागे एका नव्या मालिकेतून रसिकांच्या समोर येणार असल्याबाबत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आता या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ‘डॉक्टर डॉन’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे.झी युवावर प्रसारित होणा-या या मालिकेत डॉन असलेला डॉक्टर देवदत्त म्हणजेच ‘देवा’ त्याच कॉलेजच्या डीनच्या प्रेमात पडला आहे. पण त्याची पेशंट तपासण्याची हटके पद्धत डीनची डोकेदुखी बनली आहे. आता या अतरंगी प्रेमकथेत येणारे ट्वीट प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यात शंका नाही.

 

 

या मालिकेत तो अभिनेत्री श्वेता शिंदे देवदत्तसोबत झळकणार आहे. ही जोडी मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येत आहे. देवदत्त 2 वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मल्हारी मार्तंड्च्या रुपात घराघरात पोहोचलेला देवदत्त आता डॉक्टरच्या भूमिकेत कसे रंग भरेल हे लवकरच कळेल. 12 फेब्रुवारीपासून ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रसारित होईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive