By  
on  

लोकप्रिय मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप?

ऐतिहासिक मालिकांना आजवर कायमच लोकप्रियता मिळाली आहे. त्यापैकीच एक मालिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी. शिवपुत्र संभाजी महाराजांच्या जीवनावर बेतलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या मालिकेचा पहिला एपिसोड 2018मध्ये प्रसारित झाला होता. त्यानंतर गेली जवळपास दोन वर्षं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेच्या शेवटचा एपिसोड नुकताच शुट केला जाणार असल्याचं समजलं आहे. 

 

 

वतन मिळवण्याच्या इच्छेला नकार मिळाल्यानंतर गणोजी शिर्केंचं मन सुडाने पेटून उठलं आहे. वतनासाठी त्यांनी औरंगजेबाच्या वळचणीला जाण्याचीही तयारी ठेवली आहे. त्यांची हीच हाव स्वराज्यावर मोठं संकट येण्याची नांदी आहे. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले संभाजी महाराज, शंतनू मोघे यांनी साकारलेले शिवाजी महाराज, येसूबाई साकारत असलेल्या नम्रता गायकवाड यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive