शिवा आणि सिध्दीचे पुन्हा एकदा धुमधडाक्यात शुभमंगल !

By  
on  

अनेक आव्हानं, कसोट्या पार केल्यानंतर आता आपल्या लाडक्या सिध्दी आणि रांगड्या शिवादादाचे पुन्हा एकदा धुमधडाक्यात विवाह संपन्न होणार आहे. पराकोटीच्या तिरस्कारातूनसुद्धा सरतेशेवटी प्रेमाचा अंकुर फुटतो इतकी ताकद प्रेमात असते. सिद्धी आणि शिवा दोघेही परस्परविरोधी माणसं लग्नबंधनात अडकली पण त्यांच्या मनामध्ये कधीच एकमेकांबद्दल प्रेम भावना नव्हती... आता मात्र मालिकेमध्ये दोघांच्या संमतीने, आनंदात आणि मोठ्या जल्लोषात हा विवाहसोहळा साजरा होणार आहे... ज्यामध्ये मुलीकडून म्हणजे सिध्दीकडून असणार आहे काकी, सोनी आणि शिवाकडून असणार आहे जलवा, पिंट्या – बबल्या… या सगळ्यामध्ये मंगलचा काय सहभाग असणार आहे ? सगळे मिळून काय धम्माल मस्ती करणार ? हे नक्की बघा... यशवंत म्हणजेच शिवाचे वडील या सगळ्यापासून अनभिज्ञ आहेत... ते परत आल्यानंतर त्यांना आनंद होणार आहे हे नक्की ! 

              सिद्धी आणि शिवा ही नावे आले की आठवत ते म्हणजे गैरसमज, भांडण, वाद – विवाद, द्वेष... पण यासगळ्या भावनापेक्षा सगळ्यात पवित्र भावना म्हणजे “प्रेम”... प्रेम हे सगळ्याहून परे असते असे म्हणतात... ज्यामुळे एकमेकांचा राग करणारे दोन भिन्न व्यक्ति सुध्दा एकत्र येतात. येत्या रविवारी म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी संध्या ७ वाजल्यापासून शिवा – सिध्दीच्या प्रेमाचा हा सुंदर प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे तर विवहासोहळ्याचा एका तासाचा विशेष भाग रात्री ८ वा. असणार आहे ... तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसाचा विशेष भाग २३ फेब्रुवारी संध्या ७ ते ९ आपल्या कलर्स मराठीवर.

 

Recommended

Loading...
Share