रात्रीस खेळ चाले ही तुमची सर्वांची लाडकी मालिका. घराघरात 10.30च्या ठोक्याला ही मालिका सुरु होते. यातील अण्णा नाईकांचा दरारा मालिकेतील पात्रांप्रमाणेच चाहत्यांवरही आहे. नेहमीच माईंशी आणि कुटुंबियांशी फटकून व रागाने वागणा-या अण्णा नाईकांचा एक अनोखा अंदाज नुकताच पाहायला मिळाला. मालिकेत माईंशी कधीच प्रेमाने न वागणारे अण्णा चक्क माईंसाठी खास गाणं गायलंय...विश्वास बसत नाही ना? मग हा व्हिडीओ एकदा पाहाच
अण्णा आणि माईंचा हा भन्नाट टिक-टॉक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. नेटक-यांनी त्यावर कॉमेंट्स व लाईक्सचा वर्षाव सुरु केलाय. कधीही न पाहिलेला अण्णा आणि माईंचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना भलताच आवडतोय. जुन्या गाण्यावरचा अण्णा आणि माींनी जबरदस्त एक्सप्रेशन दिले आहेत.
आपण अण्णा व शेवंताची केमिस्ट्र ी नेहमीच पाहतो, पण अण्णा व माईंना एकत्र असा रोमान्स करताना पाहणं, म्हणजे जरा दुर्मिळच क्षण आहे. व तो कॅमे-यात कैद करण्याचा मोह आवरताच येणार नाही.