सध्या जगभर करोना विषाणूने थैमान घातलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनमानावर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या विषाणूला रोखण्यासाठी आता फक्त पूर्वखबरदारी घेणं इतकंच आपल्या हातात आहे.
मनोरंजन विश्वालासुध्दा याचा मोठा फटका बसला आहे.
सर्व मालिका सिनेमे आणि वेब शोचं चित्रिकरणही बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पण प्रत्येक जण आज या संकटाला आपण धैर्याने परतवून लावू असा धीर देताना पाहायला मिळतोय. छोट्या पडद्यावरील मोलकरीण बाई ही लोकप्रिय मालिका असंच नागरिकांचं मनोबल वाढवताना दिसली.
पाहा मोलकरीण बाईच्या टीमने करोनाला पळवून लावण्यासाठी एक झक्कास गाणं तयार केलं आहे. यात सर्व सदस्य या गाण्याद्वारे नागरिकांना या कठीण परिस्थित कोणती काळजी घ्यावी काय करु नये व महत्त्वाचं म्हणजे उगाच घाबरुन जाऊ नये हे पटवून देताना पाहायला मिळाली.
जेव्हा आपले कलाकार अशा चांगल्या गोष्टी पटवून सांगतात, तेव्हा ते नागरिकांना लगेच पटतं.