Coronavirus: ‘तुझ्यात जीव रंगला’ मलिकेतील कलाकारांनी करून घेतली तपासणी

By  
on  

सध्या करोना व्हायरसची भिती प्रत्येकालाच आहे. संसर्गापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण कसोशीने प्रयत्न करत आहे. मालिकेच्या सेटवरही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नुकतीच 'तुझ्यात जीव रंगला' च्या सेटवर दक्षता म्हणून कलाकारांपासून ते अगदी तंत्रज्ञांपर्यंत सगळ्यांचीच मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

 

यावेळी अक्षया देवधर, हार्दिक जोशीसह सर्वांची तपासणी करण्यात आली. याशिवाय अनेक मालिकांच्या सेटवरही सॅनिटायझरची सोय केली आहे. जेणेकरून करोनाचा संसर्ग होण्यास प्रतिबंध होईल. अनेक सेटवर कलाकार आणि तंत्रज्ञ मास्क लावून काम करत आहे. खरं तर उद्यापासून (19) तारखेपासून मालिका, वेबसिरीज आणि सिनेमांचं शुटिंग बंद होणार आहे. साधारणत: 31 मार्चपर्यंत ही बंदी असणार आहे. पण करोनाचा धोका दुर्दैवाने वाढल्यास ही मुदत वाढवली जाणार आहे.

Recommended

Loading...
Share