पौर्णिमेच्या रात्री आण्णा करणार का शेवंताशी लग्न की होणार तिची फसवणूक ?

By  
on  

रात्रीस खेळ चाले मालिकेत आता क्लायमॅक्सची वेळ आली की काय असं वाटत आहे. कारण शेवंताने आण्णांच्या मागे लग्नाचा तगादा लावला आहे. आण्णांनी या लग्नाला होकार देताच शेवंताने लग्नाची तयारीही सुरु केली आहे. यादरम्यान शेवंता माधवच्या हाती साखर देते. आणि येत्या पौर्णिमेला ती आणि आण्णा लग्न करणार असल्याचं सांगते.

 

 

याशिवाय आपली भेट थेट त्या घरातच होईल असंही सांगते. हे ऐकून माधवचा चेहरा पडतो. तिथून तो थेट आण्णांकडे जातो. आण्णांचे पाय धरत हे लग्न करू नये यासाठी विनवणी करतो. याशिवाय शेवंता हे सगळं पैशासाठी करत असल्याचंही सांगतो. यावेळी आण्णांच्या ओठांवर हास्य उमटतं. आता पौर्णिमेच्या रात्रीचा नेमका कोणता डाव आण्णांच्या मनात शिजत आहे. लग्नाचा घाट शेवंताच्या जीवावर तर बेतणार नाही ना, हे समजण्यासाठी पुढील भाग पहावा लागेल.

Recommended

Loading...
Share