By  
on  

पाहा रमाबाई आणि माधवराव सुट्टीचा करतायत असा सदुपयोग

कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिका प्रेक्षकांना आवडत आहे... मालिकेत रमाबाईंची भूमिका साकारणार्‍या सृष्टी पगारेचा अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. सृष्टीला अभिनयासोबतच संगिताची विशेष आवड आहे आणि ती शिकत देखील आहे... सध्या मालिकांचे शूटिंग नसल्याने तिचा गाण्याचा रियाज तिच्या बहिणीसोबत जोमाने सुरू आहे. तिची बहीण राशी तिच्याकडून रियाझ करून घेत आहे ... सृष्टी आणि राशी दोघी सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या पर्वामध्ये स्पर्धक होत्या... आता बरेच दिवस सुट्टी मिळाल्याने सृष्टीचा रियाझ चांगल्या पध्दतीने होणार हे नक्की ! मालिकेतील सावित्रीबाईंच्या पाककला तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत... अतिशय वेगळ्या आणि त्या काळातील पदार्थ कसे असतील याचा विचार करून त्या दाखविण्यात येतात... सावित्रीबाईंची भूमिका साकारणार्‍या ऋग्वेदी प्रधान यांना देखील पाककलेची खूप आवड आहे... जसा वेळ मिळेल तेंव्हा त्या वेगवेगळे पदार्थ घरी बनवत असतात. या सुट्टीमध्ये त्यांचा वेगवेगळे पदार्थ करण्याचा विचार आहे... कारण शूटिंग मध्ये असल्याकारण्याने तितका वेळ ऐरव्ही मिळत नाही...

तर मालिकेमध्ये माधवरावांची भूमिका साकारणारा चिन्मय पटवर्धन याला ऊर्दू भाषेविषयी लहानपणापासून कुतूहल आहे. या भाषेबद्दल बोलताना तो म्हणाला, “भाषेची नजाकत, गोडवा माझ्या मनाला खूप भावलं आणि कमीत कमी श्ब्दांत अर्थ पोहचवणारी शायरीच्या मी प्रेमात आहे. मी अकरावीमध्ये असताना या भाषेचे वाचन आणि तिला ऐकण सुरू केले... मिर्झा गालिब यांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांचं सगळं साहित्य मी वाचले. आणि तेंव्हापसून आजवर मी खूप वाचल आणि अजून वाचतो आहे त्यातुन शिकतो आहे. मला ही भाषा आवडते कारण मला जे म्हणायचे आहे, मला जे नेमके हवे आहे ते मी या भाषेमधून लोकांना सांगू शकतो”. चिन्मय स्वत: झिनत – ऐ – गझल शिकला आहे.... आणि या सुट्टीमध्ये तो काही छोट्या गोष्टी उर्दू भाषेमध्ये लिहणायचा प्रयत्न करणार आहे....

प्रत्येक कलाकाराचे त्यांचे असे काही वेगवेगळे छंद आहेत... जे ते त्यांच्या परीने जोपसणायचा कटाक्षाने प्रयत्न करत आहेत ...

Recommended

PeepingMoon Exclusive