पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाच्या विळख्यातून देशाला सोडवण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. ह्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर फक्त जीवनावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा सोडल्या इतर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिकांना सक्तीने घरी बसण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे रसिकांनी या दरम्यान रामायण व महाभारत ही गाजलेली पौराणिक मालिका पुन्हा दाखविण्याची जोरदार मागणी केली होती. या मागण्या मान्य करुन आज शनिवारपासून रामायण मालिका दुरदर्शनवर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला.
विरंगुळ्यासाठी आणि जुन्या आठवणींमध्ये रमण्यासाठी पुन्हा एकदा ८० च्या दशकातील मालिका प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या मालिकांमध्ये ‘मालगुडी डेज’, ‘चाणाक्य’ आणि ‘द जंगल बुक’ या मालिकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे #malgudidays हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत प्रेक्षकांनी या मालिकेच्या प्रसारणासाठी जणू एक कॅम्पेनच चालवलं. ही मालिका पुन्हा दाखविण्याची मागणी सध्या दोर धरतेय.
दुरदर्शनवर रामायण व महाभारतनंतर आता मालगुडी डेजसुध्दा रसिकांच्या भेटीला येणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.