By  
on  

झी मराठीवरील या दोन मालिकाही येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आता वाहिन्या सरसावल्या आहेत. यापुर्वी दुरदर्शनवर रामायण, महाभारत या मालिका सुरु झाल्या आहेत. याशिवाय झी मराठीवर ‘स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका देखील सुरु झाली आहे. याच धर्तीवर झी मराठीच्या आणखी दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापैकी एक आहे ‘जय मल्हार’ आणि दुसरी आहे ‘तुला पाहते रे’.

 

तुला पाहते रे मालिकेतील विक्रांत आणि इशा यांची रोमॅंटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खुपच आवडली होती. आता ही मालिका 6 एप्रिलपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय जेजुरीच्या श्री खंडेरायाची चरित्रगाथा सांगणारी ‘जय मल्हार’ ही मालिकासुद्धा घराघरांत लोकप्रिय झाली होती. मल्हाररायांची भूमिका साकारणारे देवदत्त नागेही या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले होते. म्हाळसाबाईंच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूबाईंच्या भूमिकेतील ईशा केसकर यांच्याही भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive