लॉकडाउनमध्ये सुरु होतेय ही जुनी मराठी मालिका 

By  
on  

लॉकडाउनमध्ये सध्या टेलिव्हीजनवर जुन्या मालिकांचा आस्वाद घ्यायला मिळतोय. मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद असल्याने मालिकांचे नवे एपिसोड्स पाहायला मिळत नाही. त्यातच सध्या सगळे घरीच असल्याने टेलिव्हिजनवर काय पाहायचं हा प्रश्न आहे. मात्र काही जुन्या प्रसिद्ध मालिका आता टेलिव्हीजनवर पुन्हा पाहायला मिळत आहेत. यात 'रामायण', 'महाभारत' या जुन्या प्रसिद्ध मालिका पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल आहे. त्यातच काही जुन्या मराठी मालिकाही पुन्हा पाहायला मिळत आहेत. 

अभिनेत्री निर्मिती सावंत आणि मानसी कुलकर्णी यांची '1760 सासूबाई' ही गाजलेली मालिकाही आता पुन्हा पाहायला मिळेल. या विनोदी मालिकेत सासू सूनेची जोडी जी घराबाहेर आणि घराच्या आतही एकत्र काम करतात आणि त्यांची धमाल पाहायला मिळाली होती. आणि आता हीच धमाल या निमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. आजपासून ही मालिक कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 


 

Recommended

Loading...
Share