Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकल्यानंतर आप्पा म्हणतात... .

By  
on  

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केलं. देशवासियांना त्यांच्याकडून करोना संकटादरम्यान आणखी कोणते, महत्त्वपूर्ण निर्णय, कोणते कायदे, कुठले नियम शिथील , देशाची पुढील वाटचाल अशा गोष्टींबद्दल ऐकण्याची आस होती. परंतु ते काही भलतंच बोलत होते. देश स्वातंत्र्यपूर्व काळात कसा होता, सोन्याचा कसा धूर निघायचा वगैरा वगैरा. यावेळी काहींना तर मोदीजींना नेमकं काय सांगायचं आहे, हाच प्रश्न सारखा सतावत होता. 

मग माझा होशील ना या झी मराठीवरील प्रसिध्द मालिकेतील आदित्यचे आजोबा म्हणजे आप्पा यांना सुध्दा मोदींच्या या भाषणानंतर हाच प्रश्न पडला, तेसुध्दा मिश्कील संवादात आपल्या नातीसह इन्स्टाग्राम व्हिडीओदारे म्हणतात, भाई कहना क्या चाहते हो? 

यावेळी मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. करोना भारतात संधी घेऊन आला आहे, असं मोदींनी म्हटलं.

Recommended

Loading...
Share