By  
on  

या मालिकेने लावलं होतं तरुणाईला वेड, कलाकार मिस करत आहे ते दिवस

प्रसिद्ध दिग्दर्शक - निर्माते संजय जाधव यांच्या फ्रेशर्स या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. संजय जाधव यांची निर्मिती असलेली ही मालिका तरुणाईसाठी होती. आणि म्हणूनच तरुण प्रेक्षकांचा या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत शुभंकर तावडे, मिताली मयेकर, अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर, रश्मी अनपट, ओंकार राऊत, सिध्दार्थ खिरीड,विद्याधर जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.

अभिनेत्री मिताली मयेकरने याच मालिकेची आठवण पोस्ट केली आहे. सध्या लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोकं जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. त्यातच मितालीने या मालिकेतला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत मिताली, रश्मी, अमृता, रसिका या चौघी जणी या फोटोत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Those were the days!️ #freshersdays #overwhelmed #keepthelovecoming

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

 

मितालीने हा फोटो पोस्ट केलेला पाहून फ्रेशर्स मालिकेच्या चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. मितालीेने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेता सिध्दार्थ चांदेकरसोबतचं तिचं रिलेशन चर्चेत आहे. दोघांनी मागील वर्षा साखरपुडाही केला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive