By  
on  

लॉकडाउनमध्ये भावोजी पोहोचणार घरोघरी, सुरु होतय 'होम मिनिस्टर घरच्या घरी'

कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या प्रत्यक्षात घराघरात पोहोचणारा कार्यक्रण म्हणजे ‘होम मिनिस्टर’. हा कार्यक्रम कित्येक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. शिवाय भावोजी म्हणून घराघरात पोहोचणारे आदेश बांदेकरही या प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. लॉकडाउनमुळे हा कार्यक्रमही बंद आहे. मात्र लॉकडाउनच्या परिस्थितीतही हा कार्यक्रम हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या वाहिनीने नुकताच या कार्यक्रमाचा नवाकोरा प्रोमो प्रदर्शित केला आहे.

लॉकडाउनच्या काळातही आता आदेश भावोजी घरोघरी पोहोचणार आहे. कारण आता होम मिनिस्टर हा कार्यक्रम घरच्या घरी होणार आहे. झी मराठी वाहिनीने नुकत्याच केलेल्या या पोस्टमध्ये लिहीलय की, “तर मंडळी झाली का तयारी? लॉकडाऊनच्या काळातही भावोजी हजर होणार घरोघरी. 'होम मिनिस्टर घरच्या घरी'” तेव्हा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आदेश बांदेकर हे त्यांच्याच घरात बसून मोबाईलद्वारे या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत.  या नव्या प्रोमोत या कार्यक्रमासाठी आदेश बांदेकर तयार होताना दिसत आहेत. तेव्हा कित्येक वहिनी आता घरातच नटून थटून तयार होऊन या कार्यक्रमात सहभागी होतील. घरातूनच पार पडणाऱ्या या कार्यक्रमाची ही नवी संकल्पना कौतुकास्पद आहे.
येत्या 8 जूनपासून हा कार्यक्रम पुन्हा नव्याने भेटीला येत आहे. मात्र आता 'होम मिनिस्टर घरच्या घरी' असं या कार्यक्रमाचं नाव असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive