लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम जरं ठप्प झालं असलं, सध्या चित्रीकरण बंद असलं तरी निराश न होता, हार न मानता काही कलाकारांनी घरातच काहीना काही व्हिडीओ तयार केरे. काहींनी चक्क घरातून चित्रीकरण केलं. तेच बनले कॅमेराम, लाईटमन, मेकअप दादा आणि सगळचं. आठशे खिडक्या नऊशे दारं ही नवी मालिकाचं चक्क् घरातून चित्रीकरण सुरु करुन प्रसारित करण्यात आली.
आता मराठी प्रेक्षकांचा आवडता एक कार्यक्रम या लॉकडाउनमध्ये भेटीला येत आहे. होम मिनिस्ट हा पैठणीचा खेळ पुन्हा रंगणार आहे. कारण आदेश बांदेकर भावोजी पुन्हा घरोघरी पोहोचणार आहे. मात्र यंदा घरातूनच फोनच्या माध्यमातून चित्रीकरण करून हा शो करण्यात येईल. ‘होम मिनिस्टर घरच्याघरी’ लवकरच सुरु होत आहे. आणि याचीच उत्सुकता सर्व कलाकारांना लागली आहे. अभिनेता अभिजीत आणि सुखदा खांडकेकर हे रियल लाईफ कपलही आदेश भावोजींच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. तर दुसरीकडे अभिनेता सागर कारंडेही पैठणीच्या खेळाची तयारी करु लागलाय. तर हे सगळे कलाकार होम मिनिस्टर घरच्याघरी च्या नव्या प्रोमोमध्ये झळकत आहेत.
आता होम मिनिस्टर पुन्हा होतय म्हटल्यावर महिला मंडळ आणि त्यांचं कुटुंब पैठणीच्या खेळाची तयारी करत असणार एवढं नक्की.