सध्या लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद आहे. लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र कला विश्वातील कलाकारांनी तोपर्यंत धिर सोडलेला नाही. काही कलाकार घरात राहूनच विविध चित्रीकरण करत आहेत. काहीहीं विविध विषयावर व्हिडीओ आणि शॉर्टफिल्मही बनवल्या आहेत.
झी मराठी वाहिनीने मात्र प्रेक्षकांचा विचार करुन त्यांच्या आवडत्या मालिकांचे वेबीसोड्स आणले आहेत. या वेबीसोडमध्ये मालिकेच्या ट्रॅकमध्ये पुढे काय घडतय हे थोडक्यात दाखवलय. मात्र कलाकारांनी कुठेही सेटवर चित्रीकरण न करता आपाआपल्या घरातूनच चित्रीकरण केलेले आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबीसोड्समध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' आणि 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचे शॉर्ट वेबीसोड प्रदर्शित करण्यात आले आहेत. हे वेबीसोड वाहिनीच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.