‘गर्लफ्रेंड प्यारी, पण इच्छाधारी’ अशी धमाल टॅगलाईन असलेल्या प्रेम पॉयझन पंगा या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आलाप आणि जुईची हटके प्रेमकहाणी प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता यावी यासाठी तयारीही सुरु आहे.
दोन महिन्याहून अधिक कालावधीत जुन्याच मालिकांचं प्रक्षेपण पाहिलेल्या प्रेक्षकांना आता फ्रेश एपिसोडस पाहता येणार आहेत.
प्रेम पॉयझन पंगाच्या सेटवर आता शुटिंगला सुरुवात झाली आहे. शासनाचे सर्व नियम पाळत आणि सुरक्षेची काळजी घेत शुटिंगला सुरुवात झाली आहे.
सेटवरील डॉक्टरांकडून कलाकारांची तपासणीही केली गेली. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही केला जात आहे.