आपण अनलॉकच्या टप्प्याकडे जात आहोत अशा वेळी संथ गतीने का होईना सगळ्याला सुरुवात होताना दिसते आहे. हळू हळू मालिकांच्या शुटिंगलाही सुरुवात होताना दिसते आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ मालिकेचे शुटिंगही आजपासून सुरु झाले आहे.
शुटिंगबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन शुटिंग केले जात आहे. आता प्रेक्षकांना लवकरच त्यांच्या आवडत्या मालिका आणि कलाकार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत.