By  
on  

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चे नवीन भाग लवकरच रसिकांच्या भेटीला , शुटींगला झाली सुरुवात

सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे चित्रीकरण सोमवारपासून सुरु झाले आहे.चित्रीकरणाबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण केले जात आहे.

सेट वर ॲम्ब्युलन्स पासून डॉक्टरपर्यंत सर्व सुविधा आहेत. चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी सेटवर प्रत्येकाचं चेकअप केलं जात. हास्यजत्रेचे परीक्षक असणारे सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक हे सुद्धा चित्रीकरणास उपस्थित होते. समीर चौगुलेने गणेश पूजा करून चित्रीकरणाला सुरुवात केली.

आता प्रेक्षकांना लवकरचं त्यांचा आवडता कार्यक्रम आणि त्यांचे लाडके विनोदवीर प्रसाद-नम्रता, समीर विशाखा, गौरव-वनिता यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तर पाहात राहा महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive