आषाढ महिना सुरु झाला की विठ्ठल भक्तांना वेध लागतात ते पंढरपूर वारीची. आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने पंढरपुरात जनसागर उसळतो . मात्र यंदा करोनाचं सावट असल्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा साजरा झाला. मात्र प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या मनात विठूमाऊली आणि रखुमाईची मुर्ती कोरली गेली आहे. त्यामुळे आज हे भक्त करोना संकटामुळे जरी घरी असले तरी विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले आहेत.
'विठू माऊली' मालिकेमुळे अजिंक्य राऊत हे नाव घराघरांत पोहचलं. या मालिकेतील त्याचं विठ्ठल रुप पाहून ...विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊयात.
कोठारे विशनने 'विठू माऊली' मालिकेची निर्मिती केली.
आज आषाढी एकादशीनिमित्त मालिकेतील खास फोटो शेअर करत विठ्ठल भक्तांना मंगलमय शुभेच्छा दिल्या.