By  
on  

प्रेक्षकांना पहायला मिळणार ‘सावित्री जोती’ मालिकेचे नवे एपिसोड

 सोनी मराठी वाहिनीवरील सावित्रीजोती मालिकेचे चित्रीकरण आजपासून सुरु झाले आहे. सोनी मराठीने आजवर अनेक उत्तमोत्तम मालिका रसिकांच्या भेटीला आणल्या आहे.  राजमाता जिजाऊंनंतर आता सोनी मराठी पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जीवन गाथा पडद्यावर आणली. 

 

सावित्री जोती या मालिकेचं चित्रिकरण करोनामुळे थांबलं होतं. पण आता चित्रीकरणाबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. अश्विनी कासार आणि ओंकार गोवर्धन आणि इतर कलाकारांच्या  उपस्थितीत चित्रीकरणाला सुरुवात झाली. आता प्रेक्षकांना लवकरचं त्यांची आवडती मालिका आणि कलाकार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. तर पाहात राहा सावित्रीजोती संध्या. 7:30 वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive