लॉकडाऊनकडून आता आपण अनलॉकच्या टप्प्यामध्ये हळू हळू का होईना सगळ्याला सुरुवात होताना दिसते आहे. तीन महिने बंद राहिलेली सिनेसृष्टीही आता सुरु होते आहे. हळू हळू मालिकांच्या शुटिंगलाही सुरुवात होताना दिसते आहे. काही दिवसांपुर्वीच सरकारचे नियम व अटी यांचं योग्य ते पालन करत अनेक मालिकांच्या शुटिंगला सुरुवात होत आहे.
‘ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण ही देखील त्यातीलच एक मालिका. झी युवावरील या सुपरफ्रेश मालिकेच्या शुटिंगलाही सुरुवात झाली आहे. आता शुटिंगबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. या निमित्ताने प्रेक्षक त्यांच्या लाडक्या जोडीला पुन्हा एकदा पाहू शकतील.