By  
on  

रणजित ढाले-पाटलांची प्रेक्षकांना भेटण्यासाठी सुरु आहे जोरदार तयारी, पाहा व्हिडियो

लॉकडाऊनचं ग्रहण संपून अनलॉकला सुरुवात झाली आहे. यासोबतच मालिकांच्या शुटिंगलाही सुरुवात होताना दिसते आहे. तेच तेच पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना आता नव्या एपिसोड्सची ओढ लागली आहे. राजा राणीची ग जोडी ही मालिकाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. सर्वांनाच रणजीत व संजीवनीची केमिस्ट्री पाहण्याची आतुरता लागून राहिली आहे.

 

 

या मालिकेतील फौजदार म्हणजेच रणजित ढाले पाटील अर्थात मणिराज पवारही शुटिंगसाठी जोमाने तयारी करतो आहे. मणिराजचा नुकताच एक व्हिडियो समोर आला आहे. यात तो मेक अप करताना दिसतो आहे. पण यादरम्यान स्वच्छतेची पुर्ण काळजी घेताना तो दिसत आहे. आता चाहतेही त्याला पुन्हा पाहायला उत्सुक असतील यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive