By  
on  

आता प्रेक्षकांचा जीव होणार येडा पिसा, मालिकेच्या शूटींगचा झाला श्रीगणेशा !

करोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास तीन महीने सर्वकाही ठप्प झाले होते.पण आता अनलॉकमध्ये मात्र गाडी हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेच्या शूटींगला नुकतीच सुरुवात झाली आहे.याबाबतची पोस्ट मालिकेचा नायक शिवा म्हणजेच अभिनेता अशोक फळदेसाईने आपल्या इन्स्टाग्रामवरुन केली आहे.  शिवा आणि सिध्दीची जोडी प्रेक्षकांना खुप भावते. 

सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर शूटींगचा  श्रीगणेशा झाला. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले आहे. ‘‘जीव झाला येडापिसा’  मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली मग ती कथा असो, रिअल लोकेशन्स असो वा मालिकेतील पात्र असो. प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम दिले आणि आता लवकरच मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

 

मालिकेतील कलाकार दिवसातील जास्तीत जास्त वेळ सेटवरच असतात. आणि म्हणूनच सेट म्हणजे कलाकारांसाठी जणू दुसरं घरच असतं. मालिकेच्या संपूर्ण टिमशी घरोप्याचे संबंध तयार होतात. त्यामुळे सेटवरील सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मंडळी तीन महिन्यानंतर झालेल्या भेटीनंतर थोडे भाऊक झाले पण त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साहदेखील होता. चित्रीकरण सुरू झाले असून मालिकेची टिम आता सज्ज झाली आहे प्रेक्षकांना पुन्हा भेटण्यासाठी ! शूटिंगदरम्यान मास्क घालून वावरणे अनिवार्य असणार आहे, याचसोबत आवश्यक तितक्याच क्रूमेंबर्सच्या उपस्थिती चित्रीकरण पार पडणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive